Ad will apear here
Next
एक नोव्हेंबरपासून सरकारी बँकांच्या वेळेत बदल
सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ एकसमान होणार


पुणे :
एक नोव्हेंबर २०१९पासून सर्व सार्वजनिक बँकांच्या कामकाजाच्या वेळा एकसारख्या होणार आहेत. केंद्र सरकारच्या ‘ईज (इएएसइ) 2.0’ अन्वये बँकिंगमधील सुधारणांअंतर्गत हा बदल करण्यात येणार आहे. 
 
इंडियन बँक्स असोसिएशनने देशामधील बँकिंग वेळांची तीन गटांत विभागणी केली आहे. रहिवासी क्षेत्रात असणाऱ्या सर्व सार्वजनिक बँकांच्या वेळा सकाळी नऊ ते सायंकाळी चार, ग्राहकांसाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन, तर व्यापारी क्षेत्रातील बँकांच्या वेळा सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि ग्राहकांसाठी अकरा ते सायंकाळी पाच  वाजेपर्यंत, अन्य क्षेत्र व कार्यालयांसाठी बँकांच्या वेळा सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत व ग्राहकांसाठी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अशा राहणार आहेत.

जिल्हानिहाय बँक व शाखानिहाय बँक कामकाजाच्या वेळेबाबतचा तपशील बँक ऑफ महाराष्ट्रच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, शाखानिहाय वरिष्ठ कार्यालयामार्फत सूचना देण्यात येणार आहे; तसेच बँकेच्या प्रत्येक शाखेद्वारे बदलेल्या कामकाजाच्या वेळा सूचना फलकावर लावण्यात येणार आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZRYCF
Similar Posts
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौड पुणे : माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
धनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बाजारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
रितू छाब्रिया यांना ‘एशियन बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ प्रदान पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज संलग्नित मुकुल माधव फाउंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांना नुकत्याच दुबई येथे झालेल्या सोहळ्यात ‘एशिया बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे यांचे युरोपातील आइस स्केटिंग स्पर्धेत यश पुणे : इंटरनॅशनल स्केटिंग युनियनतर्फे युरोपातील बेलारूस येथे घेण्यात आलेल्या आइस स्केटिंग स्पर्धेत पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे या दोघांनी यशस्वी कामगिरी केली. पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात पाचशे, हजार आणि पंधराशे मीटर स्केटिंगचे टप्पे यशस्वीपणे पार करत ओमने बेलारूस करंडक पटकावला. १९ वर्षांखालील गटात स्वराली देवने करंडक जिंकला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language